मी उद्यापासून सात्त्विक आहार सुरू केला तर त्याने माझी जात बदलणार आहे का?
शाहू पाटोळेंनी ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ लिहून झाल्यावर तब्बल नऊ वर्षांनी म्हणजे 2024 साली त्याचं इंग्रजी भाषांतर प्रकाशित झालं आहे. मुख्यधारेतल्या माध्यमांमध्ये क्वचितच दिसणारे पदार्थ या पुस्तकात कसे अवतरले, संशोधनाची पद्धत, आवडत्या भाज्या आणि अशा बर्याच गोष्टींबद्दल पाटोळेंशी मारलेल्या या गप्पा.